कामगार युवकाचा खांद्यापासून हात रुई च्या पट्ट्यात गेला

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अवघ्या 20 वर्षात एक हात कायम गमावून अपंगत्व आणलेल्या युवकाला न्याय मिळत नसल्याने त्याला त्याच्या न्याय हक्कासाठी अखेर पोलिसात तक्रार दाखल करावी लागली. तशी रीतसर तक्रार उत्तरप्रदेश येथील एका युवकाने मारेगाव येथील एका सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचा साथीदारास दोष देत 71 दिवसानंतर मारेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राजा बिजय बिरसिंग चौहान (20) खेरिया पो. डुमरी, जि. एटा उत्तरप्रदेश असे पीडित अंकुशल कामगारांचे नाव आहे. ते गेल्या 7 महिन्यापासून या जिनींग मध्ये कामावर असताना हा अपघात झाला. या अपघातात कामगारांचा हात प्रेसिंग मशीनच्या पट्ट्यामध्ये अडकूण त्याच्या धडा वेगळा झाल्याने त्याच्यावर प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले होते. शस्त्रक्रिये नंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी या घटनेची फिर्याद मारेगाव पोलिसात काल ता. 12 मे रोजी दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लिजधारक गौरी शंकर खुराणा यांचे सह येथील सुपरवायझर प्रफुल झाते यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कापूस उत्पादकाच्या कापसाला प्रोसेसिंग करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली वसंत जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री तीन वर्षासाठी लिजवरती गौरीशंकर खुराणा यांना देण्यात आली आहे. 26 लाख 25 हजार रुपये प्रति वर्षा प्रमाणे देण्यात आलेल्या या फॅक्ट्रीच्या लिजला दोन वर्ष पूर्ण होऊन तिसरे वर्ष सुरु झाले आहे. या जिनींग मध्ये बहुतेक परप्रांतीय कामगार पूर्ण वेळ अनेक कामे करीत आहेत.12 हजार रुपये मासिक पगारावर ही कामगार कामे करीत असताना अनलिमिटेड तासिकामध्ये ही कामे केली जातात असा आरोप आहे. कुशल कामाची जबाबदारी अकुशल कामगारांमार्फत केली जात असल्याने कामगार असुरक्षित असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बेरोजगारीचा पुरेपूर लाभ उठविण्यासाठी लिजधारक 24तास मजुरा कडून कामे करून घेतात. माझ्या अपंगत्वास लिजधारक कारणीभूत आहेत.
-राजा विरसिहं चौहान
पीडित कामगार

पीडित कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी लागणारा खर्च मी उचलला आहे. या गरीब कामगारांच्या पाठीशी मी जातीने उभा राहील न्याय मिळे पर्यंत संघर्ष करेल. गुन्हा नोंद झाला असला तरी पंचनामे बाकी आहे. त्या नंतर पुढची दिशा ठरवू
- रामसिंग राघव
सामाजिक कार्यकर्ते गुडगाव
हरियाणा

सुरक्षेची उपाय योजना केली गेली तर फॅक्ट्री मधील कामगार सुरक्षित कामे हाताळू शकतो मजुरा कडून किती तास कामे करून घ्यायची या बाबत नियोजन केल्यास अपघाताच्या घटना टाळता येऊ शकतात

-आंनंद अचलेवर
तपास अंमलदार, मारेगाव बिट


कामगार युवकाचा खांद्यापासून हात रुई च्या पट्ट्यात गेला कामगार युवकाचा खांद्यापासून हात रुई च्या पट्ट्यात गेला Reviewed by सह्याद्री चौफेर on May 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.