सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. मारेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीस वणी तालुक्यातील सोनापूर येथील एका युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. मात्र, घटनेच्या अवघ्या चार तासात आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी दि.१२.०५.२०२३ रात्री चे दरम्यान घरी दिसुन आली नाही. तिचा सर्वत्र नातेवाईकाकडे शोध घेतला असता, तिचा थांगपत्ता लागला नाही. तिला कोणतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेले असल्याची तक्रार मुली च्या वडिलांनी पोलिसात दिली व आपआपले पो.स्टे. हद्दीत सदर मुलीचाशोध घेवून मिळून आल्यास पोस्टे मारेगाव येथे कळवावे अशी आर्तहाक केली.
याप्रकरणी पोलीस अन्वेशन अधिकारी नापोका १९८३ रजनीकांत एस. पाटील व अजय वाभीटकर यांनी फूस लावून पळविलेल्या इसमाचा अवघ्या चार तासात छडा लावला असून त्यास भद्रावती तालुक्यातील पिरली येथून ताब्यात घेतल आहे.
मारेगाव : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; अवघ्या चार तासात आरोपीला घेतलं ताब्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 13, 2023
Rating:
