माजी केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या हस्ते अविनाश लांबट यांचा सत्कार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकीत भरगोस मताने भाजप पुरस्कृत एकमेव निवडून आलेले उमेदवार अविनाश भाऊ लांबट (अभासंप तालुका अध्यक्ष) यांचा आदरणीय श्री हंसराजभैया अहीर साहेब अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (कॅबिनेट मंत्री दर्जा) व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री भारत सरकार, यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

भैया यांनी मारेगांव येथे भेट देऊन, नुकताच पार पडलेल्या मारेगांव कृषि उत्पन्न बाजार समितिच्या निवडणुकित संचालक पदी श्री अविनाशभाऊ देविदासजी लांबट हे बहुमताने विजयी झाले त्यामुळे त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे अभिनंदनसह सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटीत पुढील कार्यक्रम कसे यशस्वी करता येईल यावर सुद्धा विशेष चर्चा केली.

यावेळी मारेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शशिकांत आंबटकर काका, शंकराव लालसरे, नगरसेवक वैभव पवार, युनूस सेठ, किशोर बावणे सह सर्व सन्माननीय तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या हस्ते अविनाश लांबट यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या हस्ते अविनाश लांबट यांचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on May 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.