कात्री येथे गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ


सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : महादिप स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थी पासुन इतर विदयार्थ्याना प्रेरणा मिळावी , त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावे , त्याच्यात जिद्द निर्माण व्हावी या उद्देशानाने तालुक्यातील कात्री येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात कळंब पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अमोल वरसे यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ साजरा करण्यात आला.

ग्रामीण भागात राहुन घरची प्रतिकुल परीस्थिती असतांना जिद्द, चिकाटी व महादिप स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचे ध्येय उराशी बाळगुन, अभ्यास व आत्मविशाच्या बळावर कात्री येथील जि प उच्च प्राथमिक डिजीटल शाळेत शिकत असलेली विदयार्थीनी कु वैष्णवी अशोक वाल्दे ही महादिप स्पर्धा परिक्षेत कळंब तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमुख मान्यवंरांच्या हस्ते कु वैष्णवी वाल्दे हिचा सत्कार करण्यात आला.

सर्व प्रथम मान्यवंरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे सहाय्यक शिक्षिका सारीकाताई हजारे यांनी केले. या प्रसंगी शाळेचे मुख्यध्यापिका रत्नमालाताई ढुमने यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश व भुमिका या बद्दल प्रास्ताविकातून माहिती दिली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन कात्री येथील सरपंच सौ सविताताई गाऊत्रे, उपसरपंच शेख जमिल शेख गुलाब, ग्रा पं सदस्य तथा शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष प्रफुल भुजाडे, दैनिक प्रतिनिधी रूस्तम शेख, शाळेचे केंद्र प्रमुख कल्पनाताई हजारे, वैष्णवीच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे तसेच वैष्णवीच्या यशस्वी होण्या मध्ये सिंहाचा वाटा असणारे तिचे वडिल श्री अशोक वाल्दे व आई अर्चनाताई वाल्दे हे सुद्धा उपस्थित होते.

या प्रसंगी विविध स्पर्धा मध्ये यशस्वी झालेली विदयार्थी कु राहेमिन रुस्तम शेख, साहिली डंभारे, कु निकीता गेडाम, सुहाना चौधरी, आदित्य भुजाडे, समृद्धी पाटील, सोनल डंभारे, तृप्ती पाचखेडे, अक्षरा गाऊत्रे, ओंकार बन्सोड, निशांत डुबे इ. विदयार्थ्याचा सुद्धा या प्रसंगी मान्यवंराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला स्वातीताई डुबे,उरकुडे भाऊ, जोत्सनाताई गेडाम, सचिन मेश्राम सर, नस्करी सर, हेडाऊ सर, अरगुलवार मॅडम, पाचखेडे भाऊ इ. मान्यवर उपस्थित होते.

या वेळी शाळेचे सहाय्यक शिक्षक प्रकाश सालपे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच भविष्यातही गावातील नागरीकांनी असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Popular posts from this blog

तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना