टॉप बातम्या

पांदन रस्ता तात्काळ खुला करून द्या, शेतकरी आंडगे यांनी उपसले महाराष्ट्र दिनी कुटुंबासह आमरण उपोषणाचे हत्यार!

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागाव : महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे व जीवन पांडुरंग आंडगे यांच्या शेतात जाण्यासाठी असणारा पांदण रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे त्यांचा ऊस अघाप ही शेतात उभा आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, रस्ता खुला करून देण्यासाठी त्यांनी ०३/०२/२०२१, पासून ०३/०३/२०२३ पर्यंत ७ वेळा वारंवार प्रशासनाला निवेदने दिली व महागाव तहसील कार्यालयासमोर दि.५ डिसेंबर २०२२ आमरण उपोषण केले होते व त्यावेळी उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिले तरी सुद्धा सदर पांदण रस्त्याचं काम कोणत्याही प्रकारे सुरुवात झाली नाही. यावर प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही त्यांच्या शेतात आजही ऊस उभा आहे त्यामुळे शेतकरी आंडगे यांनी आज दि. ११ एप्रिल २०२३रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार महागाव, यांना निवेदन देऊन पांदन रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी केली अन्यथा सोमवार दि.१ मे२०२३ ला महाराष्ट्र दिना पासुन‌ कुटुंबासह व बैलगाड़ी सह तहसील कार्यालय महागाव समोर उपोषण करण्याचा इशारा अन्यायग्रस्त शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी निवेदनाद्वारे तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

मि यापूर्वी ५ डिसेंबर २०२२ ला उपोषण केले होते व त्यावेळी मला आपल्या शेतापर्यंत पांदन रस्ता रोजगार हमी योजनेतून करून देण्यात येईल असे लेखी पत्र देण्यात आले होते. मात्र, पाच सहा महिने झाले तरी कोणतेही काम झाले नाही. मला विद्यमान आमदार, तहसीलदार, यांनी आश्वासनाचे गाजर दिले आहे. माझ्या शेतात आजही ऊस उभा आहे, माझा उदरनिर्वाह पूर्णतः शेतीवर आहे त्यामुळे मला रस्त्याशिवाय पर्याय नाही.

-पांडुरंग सखाराम आंडगे
(शेतकरी हिवरा संगम)
Previous Post Next Post