अतिशय मन सुन्न करणारी घटना: डाॅक्टर दांपत्य ठार

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : वरोरा भद्रावती महामार्गावर भीषण अपघात घडला. शेंबड परिसरात टिप्पची डाॅक्टर दाम्पत्याच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात डाॅक्टर महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचे पाठोपाठ डाॅक्टर पती यांचे सुद्धा वाटेतच निधन झाले आहेत. ही घटना आज बुधवार दि.22 मार्च रोजी दुपारी 3. वा. च्या दरम्यान घडली असा कयास आहे.

डाॅक्टर दांपत्य ठार

अतिशय हुशार व मनमिळाऊ स्वभावाचे डॉ अश्विनी गौरकर (झाडे) ह्या स्पॉट वरच ठार झाले व त्यांचे पती डॉ अतुल गौरकर यांची गंभीर स्थिती असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले, मात्र वाटेतच भद्रावती जवळ डॉ अतुल गौरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती आहे. 
ट्रकचालक  ताब्यात 

या प्रकरणी ट्रकचालक अभिमन्यू साखीर (वय 25, रा. कुसना, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याचेकडून वरोरा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.  अश्विनी गौरकार (झाडे) व त्यांचे पती डॉक्टर अतुल गौरकार (32) हे चंद्रपूर वरून भद्रावती-वरोरा महामार्गावरुन त्यांच्या गाडी क्रमांक एम एच 34 एएम 4240 ने मोटारीतून निघाले हाेते. अशातच विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टिप्पर क्र एम एच 34 बी झेड 2996 ने धडक दिली. 
कारचा समोरील भाग चक्काचूर

महामार्गावरून शेंबड परिसरात असतांना त्या वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या टिप्परने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. मोटारीतील आसनावर बसलेल्या डाॅ. अश्विनी जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती डॉ अतुल याचा उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात जागीच ठार झालेल्या डॉ अश्विनी गौरकर (झाडे) ह्या जागीच ठार झाल्या तर, गंभीर जखमी झालेले डाॅ. अतुल गौरकर ह्यांना त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु वाटेत काही वेळातच ते गतप्राण झाले. त्यांना एक चिमुकला मुलगा असून या घटने संपूर्ण मारेगाव शहर हदरून गेले, आज गुढी पाडवा सण व नववर्ष या निमित्ताने ते चंद्रपूर येथे गेले, परतत असतांना ही अतिशय मन सुन्न करणारी दुःखद घटना घडल्याने वणी मारेगाव सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 


संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच पंचनामा केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
अतिशय मन सुन्न करणारी घटना: डाॅक्टर दांपत्य ठार अतिशय मन सुन्न करणारी घटना: डाॅक्टर दांपत्य ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on March 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.