महिलेची गळाफास घेवून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील विठ्ठलवाडी परीसरातील वडगाव रोडलगत राहत असलेल्या एका विधवा महिलेने आपल्या राहत्या घरातील छताला गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारला सकाळी उघडकीस आली.

रश्मी शरद हस्तक (47) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रश्मी हस्तक ह्या मुलीसोबत वास्तव्यास होत्या,सध्या मुलगी नौकरी साठी विदेशात राहते, पतीचे दोन वर्षां पुर्वी निधन झाले. त्या एकट्याच घरी राहत होत्या. आज सकाळी मुलीने आईला मोबाईल वरून संपर्क साधला असता त्या उत्तर देत नव्हत्या,त्यामुळे मुलीने शेजाऱ्यांना फोन करून सांगितले की, आई फोन उचलत नाही. तर घरी जाऊन बघा! असे सांगितल्यावर शेजाऱ्यांनी रश्मी यांना आवाज दिला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे त्यांनी दार तोडून आत बघितले असता रश्मी बेडरूम मध्ये पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आढळून आल्या, दरम्यान शेजाऱ्यांनी त्यांना खाली उतरवून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. रश्मी यांच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून, पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
महिलेची गळाफास घेवून आत्महत्या महिलेची गळाफास घेवून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on March 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.