चोपण येथील तरूण शेतकऱ्यांने विषारी द्रव्य प्राशन करून संपवली जीवनयात्रा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गुढीपाडव्याच्या दिवशी मारेगाव शहराला हादरून सोडणारी घटना आजच दुपारी माध्यमातून समोर आली असतांना तालुक्यातील चोपण येथील एका अल्पभूधारक तरूण शेतकऱ्यांने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज दि. 22 मार्च बुधवारला दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

मृतक प्रविण महादेव खिरटकर (36) असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.

चोपण स्थित प्रविण हा नेहमीप्रमाणे आजही सकाळी जनावरांना चारा, पाणी करण्यासाठी शेतात गेला होता. अशातच शेतात असलेल्या बंड्यात त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. असा कयास असून,त्यांच्या शेता शेजारील शेतकऱ्यांनी बंड्यात जाऊन पाहीले असता प्रविण हा निपचित पडून असल्याचे आढळून आल्याने त्यांनी त्यांच्या भावाला मोबाईल वरून ही बाब सांगितली, त्याचा भाऊ व नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली असता प्रविणच्या शेजारी किटकनाशकाचा डब्बा निदर्शनास आल्याने त्यांना शंका निर्माण झाल्याने त्याला तात्काळ मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ वणी येथे हलविण्यात आले, वणी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करून डॉक्टरांनी तपासून उपचार सुरू केले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

प्रवीण याच्या पाठीमागे आई-वडील,भाऊ असा आप्त परिवार आहे. 
चोपण येथील तरूण शेतकऱ्यांने विषारी द्रव्य प्राशन करून संपवली जीवनयात्रा चोपण येथील तरूण शेतकऱ्यांने विषारी द्रव्य प्राशन करून संपवली जीवनयात्रा Reviewed by सह्याद्री चौफेर on March 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.