माहूर येथे ९ रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शन होणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नांदेड : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाचे प्रदर्शन गुरुवार दि. ०९ मार्च रोजी सकाळी ११ वा. रेणुका माता शक्तिपीठ, माहूर येथे होणार आहे.

येथील स्थानिक व भाविकांनी चित्ररथ आवर्जून पाहावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी चित्ररथाचे प्रदर्शन माहूर येथे होणार आहे. चित्ररथाचे मार्गक्रमण सकाळी ११ ते १२ वा. रेणुका माता मंदिर परिसरात आहे.

महाराष्ट्र शासनाचा चित्ररथातील सहभाग अत्यंत नेत्रदीपक ठरला. महाराष्ट्राच्या या चित्ररथाने सर्व उपस्थितांची आणि हा सोहळा दूरवर पाहणाऱ्या जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
माहूर येथे ९ रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शन होणार माहूर येथे ९ रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शन होणार Reviewed by सह्याद्री चौफेर on March 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.