कानडा येथील मॅरेथॉन स्पर्धेत निलिमा निकोडे प्रथम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कानडा येथे प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी 5. किमी अंतराच्या स्पर्धेत असंख्य महिला युवतींनी भाग घेतला होता.

या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक निलिमा विठ्ठल निकोडे, डोलडोंगरगांव, द्वितीय क्रमांक भूमिका अशोक ढोके, कानडा, तृतीय क्रमांक खूशी विनोद आस्कर, कानडा यांनी क्रमांक पटकवला. तसेच प्रोत्साहन बक्षिस जानू सूखलाल ऊईके कानडा, श्रृती विनोद धोबे कानडा, मंजूषा हनूमंते हिवरा, अनूष्का अनिल येवले कानडा, हर्षाली विनोद डाहूले, यांना अनूक्रमे प्रोत्साहन बक्षिस देण्यात आले.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून संरपच सौ सूषमा रूपेश ढोके, मार्गदर्शक म्हणून लाभलेले विशाखाताई सारने, चंद्रपूर यूवा व्याख्याते राजदादा घूमनर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील असंख्य महिला युवतींची व शिवराय एकता ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होती. 
कानडा येथील मॅरेथॉन स्पर्धेत निलिमा निकोडे प्रथम कानडा येथील मॅरेथॉन स्पर्धेत निलिमा निकोडे प्रथम Reviewed by सह्याद्री चौफेर on March 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.