पारस गंधर्व ब्रिस तर्फे गोटमार यात्रेला येणाऱ्या भाविकांना नास्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था..

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथे “धूलिवंदन च्या दिवशी गोटमार यात्रेची परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहेत. 7 मार्च पासून तीन दिवसीय यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रेला येणाऱ्या भाविकांना पारस गंधर्व ब्रिक्स च्या वतीने मसाला भात वाटप करण्यात आला. 
         
तालुक्यातील बोरी गदाजी येथील “गोटमार यात्रा” ही विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील नाल्याच्या काठावर गदाजी महाराज मंदिराजवळ असलेल्या मैदानात हि गोटमार यात्रा भरवल्या जातात काल धुलीवंदनाच्या दिवशी येथे मंदिर परिसरात प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते. मंदिराशेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात. मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर दगडाने गोटमार करतात तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर दगडाने गोटमार करीत असतात. जवळपास 1 ते 2 तास हा खेळ सुरू असतो. जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात. त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकरी सांगतात. हाच थरारक खेळ बघण्यासाठी येथील यात्रेत विदर्भातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना मसाला भात नास्ता व पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी सरपंच संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट व पारस गंधर्व ब्रिक्स संचालक प्रवीण बोथले व मित्र सहकाऱ्यांनी गोटमार यात्रेत येणाऱ्या भक्तांना मसाला भात नास्ता व पिण्याच्या पाण्याची एक सामाजिक दायित्व या उद्दात हेतूने कोथुरला फाटा येथे व्यवस्था करण्यात आली. याचा लाभ येणाऱ्या असंख्य भाविकांनी घेलता असून, छान उपक्रम म्हणत यावेळी आयोजकांना होळीच्या शुभेच्छा देत भाविकांनी आभार मानले.
दरम्यान, तीन दिवसीय चालणाऱ्या यात्रा महोत्सवाचा समस्त येणाऱ्या भाविकांनी दर्शन व यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन अविनाश लांबट, प्रवीण बोथले,प्रशांत चौधरी धरी, राजु बोथले, अनिल राऊत, दिलीप आत्राम, गोपाळ ढाकणे, अनिल पारखी,आशिष खंडळकर, अमोल बोथले, हनुमान जुमनाके, गुणवंत बोथले, शरद पावंकर, सुरज गाडगे,  प्रकाश ढेंगळे, बबलू गंधारे यांनी केले आहे.
पारस गंधर्व ब्रिस तर्फे गोटमार यात्रेला येणाऱ्या भाविकांना नास्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.. पारस गंधर्व ब्रिस तर्फे गोटमार यात्रेला येणाऱ्या भाविकांना नास्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.. Reviewed by सह्याद्री चौफेर on March 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.