टॉप बातम्या

सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन तालुका वासियांचे संरक्षणाच्या दृष्टीने वेळीच उपाययोजना करा - ग्राम सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यात एकाच आठवडयात वाघाच्या हल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला. कैलास लक्ष्मण गेडेकर (४७)  निलसनी पेडगाव व बाबुराव बुधाजी कांबळे (६०) रुद्रापुर त्यामुळे तालुक्यातील जनता भयभीत झाली असून, वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली जीवन जगत आहे.

तालुक्यातील बहुतांश गावे ही जंगलालगत असल्याने शेतीसुध्दा जंगलालगतच आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठया प्रमाणात वावर आहे. दिवसेंदिवस वन्यजीव व मानव संघर्ष वाढीस लागला असून वन्यप्राण्यांच्या हल्यात अनेकांचे बळी जात आहेत. त्यातच वन्यप्राण्यांकडुन शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मा.तहसीलदार पाटील साहेब व मा.आर एफ ओ.विरुटकर साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत वरील विषयांकीत बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करुन सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन तालुका वासीयांचे संरक्षणाच्या दृष्टीने वेळीच उपायोजना करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.

यावेळी उपस्थित दादाची पा.किनेकार ग्रामपंचायत उपसरपंच साखरी.खोजिंद्र येलमुले.पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी कवठी हे उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();