सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : जिल्हास्तरीय १४ वर्षीय मुलींचे कबड्डीचे सामने यवतमाळ येथील दाते कॉलेज'च्या मैदानावर घेण्यात आले होते. त्यात अंतिम सामन्यात भारत विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कुंभा (तालुका मारेगाव) च्या मुलींच्या चमूने बाजी मारून विभागीय स्तरावर पात्र ठरली. भारत विद्या मंदिर कुंभा,ही चमु जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम सामन्यात जि.प.माध्यमिक हायस्कुल राळेगाव या संघावर विजय मिळवून ही चमू विभागीय स्तरावर पोहचली.
या सामन्याचे पंच म्हणून लालाभाऊ राऊत, दिपकभाऊ जाधव यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयभाऊ राऊत तर उद्घाटक म्हणुन त्रिवेणीताई बानते जिल्हा क्रिडा अधिकारी यवतमाळ हे उपस्थित होते. ह्या खेळाडूंचे मुख्याधापक एस. डब्ल्यू देवाळकर, पर्यवेक्षक, एस. जि. सोयाम, यांनी अभिनंदन व कौतुक केले.
शारिरीक शिक्षक डी.डी. ठेपाले, पी. बी. खुटेमाटे,
ए. सी. फुलमाळी यांचे मार्गदर्शन लाभले.