सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील सुशील विजय धानोरकर हा २८ वर्षीय युवक युनिकॉन क्रं MH29 BW 6241 या मोटरसायकलने यवतमाळ वरून मच्छिन्द्रा या गावी परत येत असताना मार्डी येथील जिनिंग जवळ मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात पायाला मार लागल्याने जखमी झाला.
सदर अपघाताची वार्ता समजताच मार्डी येथील मोहन जोगी, सुनील सोमटकर, जगदीश आवारी, अभिजित पंढरेपुरे या युवकांनी तात्काळ पोहचून जखमी युवकाला मार्डी प्रा आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु पायाला फॅक्चर असल्याने वणी येथे हलविण्यात आले.