सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : राज्यस्थान येथील पण सध्या मारेगाववासी २० वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना आज मारेगाव येथे सकाळी १०.३० वाजता च्या दरम्यान, उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीवर मारेगाव पोलिसात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
सविस्तर असे, आज बुधवारी सकाळी पीडित मुलगी आपल्या घरी जात असतांना आरोपी लखन रावत (२०) रा मारेगाव याने पीडितेला आपल्या घरी जबरदस्ती करून अत्याचार केला. या बाबत कोणाला काही सांगितल्यास सोडणार नाही अशी धमकी दिली. मुलगी घरी आली नसल्याने पीडितेची आई तिला शोधत असताना आरोपीच्या घराजवळ येताच पीडितेने आईला आवाज देऊन झालेला प्रकार सांगितला. आईला धक्काच बसला...आई रडायला लागल्याने शेजारील लोकं जमले, अशातच आरोपीने तेथून पोबारा केला. आईने पीडितेला घेवून मारेगाव पोलीस स्टेशन गाठले, आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मारेगाव पोलीस निरीक्षक पुरी यांनी आरोपीला शोधत असताना अत्याचारी थ्री व्हीलर आटोने वणीकडे जात असल्याची माहिती मिळताच ठाणेदार पुरी यांनी वणी वाहतूक शाखेचे सपोनि संजय आत्राम यांना फोन करून आरोपीची माहिती दिली. संजय आत्राम यांनी आपल्या चमुंना घेवून लालपुलिया परिसरात नाकाबंदी करून मारेगाव वरून येणाऱ्या आटोची तपासणी केली. खाजगी बस, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड येथेही त्याचा शोध घेत असतांना वरोरा रोडवरील महाविद्यालय जवळ आरोपीसोबतचा मित्र दिसला असता त्याला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, आरोपी हा लालपुलियात उतरला आणि रेल्वे स्टेशन कडे पायदळ जात आहे असे सांगितले. सोबत्याला घेवून आरोपी शोधत शोधत नांदेपेरा चौफुली ते वडगाव रोड वरून रेल्वे स्टेशन कडे जात असतांना दिसताच त्याला ताब्यात घेतले व मारेगाव ठाणेदार यांना संपर्क साधून माहिती देऊन त्या पळ काढणाऱ्या आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले. विशेष उल्लेखनीय की, एका तासाच्या आत संजय आत्राम यांनी आपल्या टीमला घेवून फरार होऊ पाहणाऱ्या आरोपीला वणीत पकडून मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई सपोनि संजय आत्राम, जमादार गोपाल हेपट, प्रदीप भानारकर, चालक किशोर डफळे यांनी केली.
पीडितेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी नराधम विरोधात भांदवीच्या कलम ३७६,३७६ (३) ५०६ सह कलम पोक्सो ४ व ६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.