सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
औरंगाबाद : आत्तापर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांची देखील परीक्षा घेण्याचा निर्णय मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रेकर म्हणाले आहेत. प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रकर म्हणाले आहे.
याबाबत बोलतांना केंद्रकर यांनी स्पष्ट केले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर खूपच खालवला गेल्याचे समोर आले. शाळेत जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांना त्यांच्याच विषयात पारंगतच नसल्याचे समोर आले. फार कमी शिक्षक होते की, ते त्यांच्या विषयात पारंगत होते. त्यामुळे शिक्षकांची देखील परीक्षा घेतली पाहिजे असा निर्णय घेतला असल्याचं केंद्रकर म्हणाले.
अशा होणार शिक्षकांच्या परीक्षा...
परीक्षेबाबत बोलतांना केंद्रकर म्हणाले की, सद्या आम्ही पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशा परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षेत निगेटिव्ह मार्क असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहे. विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षा अधिक भर असणार आहे. मात्र परीक्षा देणे बंधनकारक नसणार आहे. परंतु शिक्षकांनी या परीक्षा दिल्या पाहिजे असा माझा आग्रह असणार असल्याचे केंद्रकर म्हणाले.
आता शिक्षकांचीच होणार परीक्षा, शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं विभागीय आयुक्तांनी घेतला निर्णय..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 10, 2022
Rating:
