सह्याद्री चौफेर | रूस्तम शेख
कळंब : दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्य दिव्यांग जनजागृती सप्ताह अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नरसापुर येथे कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा दिवस दिव्यांग व्यक्ती बाबत सामान्य जनतेत जनजागृती व्हावी. दिव्यांगा प्रति संवेदना सामान्यामध्ये निर्माण व्हाव्या या उद्देशाने साजरा केला जातो. शारीरिक किंवा मानसिक घटकांच्या बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्ती प्रमाणे आपली दैनंदिन कामे ज्यांना करता येत नाही अशा व्यक्तींना आपण दिव्यांग व्यक्ती म्हणतो.
या दिव्यांग जागरूकता सप्ताह कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अमोलजी वरसे साहेब गट शिक्षणाधिकारी प स कळंब लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय सौ रुपालीताई देशमुख सरपंचा,श्रीमती हजारे मैडम केन्द्रप्रमुख,मा उमेशभाऊ काटेकर शा व्य समिति अध्यक्ष ,मा मंदाताई लांडगे ग्रा प सदस्य ,तसेच अंतराताई ठोम्बरे ग्रामीण समस्या मुक्ति ट्रस्ट च्या क्षेत्रीय समन्वयक मा.श्री सचिनजी धोबे सर मुख्याध्यापक नरसापुर लाभले.
ब्रेल लिपि चे जनक लुईस ब्रेल , साहित्तीक तथा समाजसुधारक डॉ हेलन केलर व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करुण मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व संगीत खुर्ची प्रतियोगिता या विजेत्यांना पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.मान्यवरांनी दिव्यांगविषयी आपले विचार व्यक्त केले. दिव्यांग विद्यार्थी व सामान्य असा भेद न करता त्यांना सहानुभूति नाही तर विश्वास दाखवा असे श्रीमती हजारे मैडम यांनी प्रतिपादन केले तर डॉ वनिता ठाकरे साधन व्यक्ति यांनी ३ डिसेम्बर जागतिक दिव्यांगदिन याचे महत्व विषद करताना जनमानसात जागृती निर्माण झाली पाहिजे असे सांगितले. मा वरसे साहेब यांनी मुलांशी संवाद साधुन त्यांचा आत्मविश्वास दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच दिव्यांग विद्यार्थी हा शिक्षणाचे मुख्य प्रवाहात आनन्यासाठी समावेशित शिक्षणाचे माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करावे गरजेनुसार अध्यापन व पूरक साहित्य साधने ह्याची पूर्तता व पालक जाणीव जागृती करावी असे सांगितले.
स्पर्धे दरम्यान परीक्षक म्हणून साधन व्यक्ति शगुफ्ता खान मैडम,शीतल अरगुलवार मैडम,वनिता ठाकरे मैडम कांचन वानखड़े मैडम यांनी भूमिका पार पाडली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सचिन पोटूरकर सर विशेष तज्ञ तर आभार प्रदर्शन श्री रतन गोंडे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गोंडे विशेष शिक्षक यांनी केले या कार्यक्रमाला दिव्यांग पालक, शिक्षक बी आर सी सम्पूर्ण टीम उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्विते करिता मुख्याध्यापक धोबे सर, शिक्षिका बोबडे मैडम, वालके मैडम, श्री शंकरआत्राम विशेष शिक्षक, सुजीत भगत विशेष शिक्षक,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटून करण्यात आली.
जिप वरिष्ठ प्रा शाळा नरसापुर, येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 10, 2022
Rating:
