वणी येथील एस. पीएम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश!

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : जिल्हा स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने व्हॉलीबॉल अंडर १७ मुली व हॉलीबॉल अंडर १९ मुलं अशा दोन्ही संघाने जिल्हास्तरीय जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तसेच क्रॉस कंट्री मध्ये कु. पायल मेश्राम व कु. कल्याणी खापणे हिने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
या सर्व यशाचे श्रेय विद्यार्थी शाळेतील मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांना देतात. तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांना देतात. संस्थेचे अध्यक्ष श्री नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश जी बोहरा, संस्थेचे सचिव भेदी साहेब व सहसचिव श्री अशोकजी सोनटक्के, यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यासाठी मालगडे सर, सिंग मॅडम, मडावी सर, निमकर सर, बुजोने सर, कांबळे सर, यांनी मेहनत घेतली, या यशाबद्दल सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
वणी येथील एस. पीएम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश! वणी येथील एस. पीएम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश! Reviewed by सह्याद्री चौफेर on December 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.