वाघाच्या हल्यात महिला ठार, तोरगाव (बु.) येथिल घटना


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : शेतशिवारात धान कापनी व धान बांधणीचा हंगाम सुरु आहे. असातच तोरगाव (बुज.) येथिल एक महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज 10 वाजता चे दरम्यान घडली. ब्रम्हपूरी वनविभागातील तोरगाव (बुज.) येथिल जाईबाई तुकाराम तोडरे वय 55 वर्ष ही महिला स्वता:चे शेतात धान बांधणी नतंर पडलेला धान(सरवा) वेचत असताना.दबा धरून बसलेला वाघाने महिलेवर आचानक हल्ला करून ठार केले. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी जमली.मॄत्तक जाईबाई तोडंरे यांचे पच्छात कुटुंबात सात जण असुन परिवारावर दुःखा चे डोंगर कोसळले आहे.या परिसरात नरभक्ष वाघाचे वास्तव्य असुन एका मागो-माग मानवावर वाघाचे हल्ले सुरुच असल्याने या वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा असी मागणी या परिसरातील जनतेनी केली आहे.
Previous Post Next Post