सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
नागभीड : तालुक्यातील सावरगाव - कन्हाळगाव रोडवरील सावरगाव पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रोडच्या बाजूच्या खड्ड्यात सकाळी सकाळी भ्रमंतीला गेलेला युवक रेती तस्कर ट्रॅक्टर पासून वाचण्याच्या नादात खड्ड्यात पडल्याने किरकोळ जखमी. वृत्त याप्रमाणे की कन्हाळगाव सावरगाव रोडचे काम सुरू होणार असून त्यापूर्वीच एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला आठ ते दहा फूट खोल जे.सी.बी.ने खोदुन ठेवलेला खड्डा कंत्राट दाराने तसाच खुला ठेवलेला आहे. मात्र या रस्त्याने तळोदी कडून नवरगावला जाणारी नागपूर - नवरगाव बस , किंवा इतर वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते मात्र तो खड्डा खुलाच ठेवल्यामुळे या खड्ड्यात मोठे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नकारता येत नाही. अशातच आज आपल्या मित्रांसोबत पहाटेला कन्हाळगाव रोड कडे व्यायाम करायला गेलेला सावरगाव येथील युवक हितेश विलास मुंगमोडे हा व्यायाम करून परत येत असताना. सावरगावच्या नदीतून रेती चोरी करून कन्हाळगाव कडे जाणाऱ्या रेती तस्कराच्या भरगाव वेग ट्रॅक्टर पासून बचाव करण्याकरता बाजूला अचानक खड्ड्यात पडल्याने किरकोळ जखमी झाला. तरी संबंधित ठेकेदाराने बांधकाम करण्याच्या एक दोन महिना पूर्वीच असा खड्डा करून न ठेवता किंवा खड्डा खोदल्यानंतर तात्काळ बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र कंत्राटदार या गोष्टीकडे लक्ष देत नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते काही असले तरी यामध्ये बस, ट्रॅक्टर, किंवा इतर मोठे वाहन किंवा एखादी दुचाकी स्वार पडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ खड्डा बुजवावा. अशी मागणी सावरगाव येथील व सावरगाव ला ये जा करणाऱ्या कन्हाळगाव येथील रहिवासी लोकांनी केलेली आहे.