आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन आणि ग्रामपंचायत चकपिरंजी तर्फे सामूहिक फळबाग लागवडीला सुरुवात

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
                 
सावली : आज गुरुवारी चकपिरंजी येथे सामूहिक फळबाग लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चकपिरंजी येथील १८ एकर सामाजिक कुरण जमिनीच्या जागेवर ग्रामपंचायत चकपिरंजी व आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक फळबाग लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन तर्फे विविध प्रकारच्या फळझाडांची रोपे, जैविक खते, पाणी व्यवस्थापन व कुंपणासाठी जाळी उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर ग्रामपंचायत चकपिरंजी यांच्यावतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोपांचे संगोपन व संवर्धन केले जाणार आहे. जेनेकरून भविष्यातील भेळसावणाऱ्या रोजगाराच्या संबंधाने गावातील नागरिकांच्या पलायनाच्या समस्येवर आळा बसणार असून गाव स्वावलंबी व स्वयंरोजगारपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.

आजच्या या स्तुत्य उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत कार्यालय चकपिंरजीचे सरपंच मा.सौ.उषाताई गेडाम तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.वाघमारे साहेब मंडळ कृषी अधिकारी कृषी विभाग सावली, मा.श्री.आर.जी.परसावार विस्तार अधिकारी पंचायत समिती सावली, मा.श्री. भक्तदासजी आभारे, ए.पी.ओ.पंचायत समिती सावली, मा.श्री.प्रशांतजी भोयर, ए.पी.ओ.पंचायत समिती सावली, मा.भावनाताई भानारकर सचिव ग्रा.पं.कार्यालय चकपिरंजी, मा.श्री.वेणूदासजी मडावी उपसरपंच ग्रा.पं. चकपिरंजी, मा.श्री.ईश्वरजी मेश्राम पो.पा.चकपिरंजी, मा.श्री.प्रकाशजी लाटकर अध्यक्ष तंटामुक्ती समिती, मा.श्री.अनिलभाऊ स्वामी अध्यक्ष सेवा सह.सोसायटी सावली, मा.श्री.अरविंदजी भैसारे सदस्य ग्रा.पं.चकपिरंजी, मा.श्री.अमृतभाऊ चौधरी सदस्य ग्रामपंचायत चकपिरंजी, मा.सौ.मेहमूदा शेख सदस्य ग्रा.पं.चकपिरंजी तसेच मा.श्री.अर्जुनजी भोयर, मा.श्री चंदूभाऊ गुरनुले रोजगार सेवक ग्रा.प.चकपिरंजी, आय.सी.आय.सी.आय.फाउंडेशनचे विकास अधिकारी मा.श्री.अनंत गायकवाड, मंगेश राजुरकर, रंजित कोटगले. रो.ह.यो कामगार तसेच चकपिरंजी ग्रामस्थ उपस्थित होते .

मा.भावनाताई भानारकर ग्रा.पं.सचिव यांनी आय.सी.आय.सी.आय फाउंडेशनचे गावात सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देऊन प्रास्ताविक केले. मा.श्री.वाघमारे साहेब मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले. मा.श्री.आर.जी.परसावार विस्तार अधिकारी यांनी फळबाग लागवडीच्या माध्यमातून भविष्यात ग्रा.पं.चा आर्थिक दर्जा वाढून ग्रा.पं.सक्षम कशी बनेल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मा.सौ. उषाताई गेडाम ग्रा.पं. सरपंच यांनी फळाबाग लागवड करणे म्हणजे एक प्रकारची ग्रा.पं.आर्थिक बळ वाढणे आणि गावाला एक रोजगार उपलब्ध करून लोकांना स्वयंमरोजगार करण्यासाठी लावणे या मार्गदर्शनातून आय.सी.आय.सी.आय फॉउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

मा.श्री.प्रशांतजी भोयर ए.पी.ओ यांनी मजुराना फळबाग लागवड संदर्भात मार्गदर्शन केले. मा.श्री. अर्जुनजी भोयर यांनी वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे आणि त्याचे योग्य प्रकारे संगोपन केले तर गावाचा विकास होईल याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश राजुरकर यांनी केले तर आभार रंजित कोटगले यांनी मानले.