सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : वणी,मारेगाव,झरी, मुकुटबन, मार्डी या परिसरात पसरलेल्या दि वसंत जिनिंग या सहकार क्षेत्रातील नामवंत संस्थेची निवडणूक दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनल, तर काँग्रेसचे दुसरे लोकनेते अॅड. देविदास काळे समर्थित जय सहकार पॅनल, भाजप प्रणित ठाकरे गट व भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना असा चौरंगी सामना रंगणार आहे. 17 संचालक पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत 67 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे.
अंतिम टप्प्यात आलेल्या वसंत जिनिंगच्या निवडणुकीची रंगत वाढायला लागली असून जय सहकार पॅनलला मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता इतर पॅनलचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे वसंत च्या निवडणुकीत जय सहकार पॅनलचा विजय निश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष उल्लेखनीय की,निवडणुकीचा प्रचार प्रारंभ झाल्यापासून सहकारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोअर टू डोअर जाणे, मतदारांना जागृत करणे, वसंत जिनिंग सहकाराचा उदय हा सर्वसामान्य जनतेचे उत्थान करण्यासाठी झालेला आहे. तो यापुढे ही शेतकरी मायबापांना होईल, त्यासाठी परत श्री काळे साहेब यांच्या कुशल नेतृत्व व विकासात्मक धोरणाची गरज "वसंत" ला आहे, असे अनेकांचे मत ऐकायला मिळत आहे. या निवडणूक अनुषंगाने वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक नेते, पुढारी, पदाधिकारी त्यांच्या बाजूने किंबहुना त्यांच्या समर्थनात प्रचारी धुरा अत्यंत चोखंदळपणे सांभाळत आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणत याचे नक्कीच फळ विजयात रूपांतर होणार असा आशावाद अॅड. देविदास काळे व्यक्त केला आहे.
तूर्तास वणी विधानसभा मतदार संघातील सर्वात महत्वाची आणि राजकीय दृष्टया फायदेमंद असलेल्या वसंत जिनिंगची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. मतदारांनी या चौरंगी लढ्यात भक्कमपणे आमच्या जय सहकार पॅनल च्या पाठीशी उभे राहून आपले अमूल्य मत जय सहकारला आपल्या सहकार'ला भरघोस मतांनी निवडून द्याल असे आवाहन जय सहकार पॅनल च्या वतीने करण्यात आले आहे.