तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी: तालक्यातील कोलार पिंपरी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अनिरुद्ध प्रकाश बोंडे (२१) असे मृतकाचे नाव आहे. अनिरुद्ध हा आई व भावासोबत राहायचा व दूध विक्रीचा व्यवसाय करायचा. आज मंगळवारी सकाळी घरातील सदस्य उठले असता त्यांना अनिरुद्ध घरात आढळून आला नाही. त्यांनी गावात शोधाशोध केली मात्र अनिरुद्ध आढळून आला नाही. दरम्यान गुरांच्या गोठ्यामध्ये त्यांना अनिरुद्ध गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत मृतकाचे काका गजानन बोंडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
जाहिरातसाठी संपर्क : 9011152179
Previous Post Next Post