टॉप बातम्या

आता नवीन कॉलेजांना परवानगी नाही, उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय...

सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

पुणे : कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकाही नवीन कॉलेजला यावर्षी परवानगी दिली जाणार नाही. मात्र, रोजगाराभिमुख असणाऱ्या नवीन अभ्यासक्रमांना परवानगी मागितल्यास ती दिली जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

कला आणि वाणिज्य शाखेच्या 'पारंपरिक अभ्यासक्रमाऐवजी रोजगार देणारे अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक असून महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये 70 टक्के विषय नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणारे आणि 30 टक्के माणूस म्हणून घडवणारे ठेवा,' असेही पाटील यांनी नमूद केले.

NAAC मूल्यांकन अनिवार्य
'राज्यातील कॉलेजांनी नॅक मूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. नॅक मूल्यांकन करण्यासाठी काही अडचणी असल्यास सरकार सर्व सहकार्य करेल. परंतु नॅक मूल्यांकनामध्ये मागे राहू नये. हे मूल्यांकन ऐच्छिक नसून अनिवार्य आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया लवकर सुरू करावी', असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले.

'राज्यात सद्यस्थितीत ४४९४ कॉलेज तर ६५ विद्यापीठे आहेत. त्यातील १८५४ कॉलेजांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. त्यातील अनुदान मिळणाऱ्या कॉलेजांचे मूल्यांकन झाले आहे. ११७७ पैकी १०९६ कॉलेजांचे मूल्यांकन झाले आहे. मात्र, विनाअनुदानित २,१४१ कॉलेजांपैकी १,९०९ कॉलेजांनी नॅकचे मूल्यांकन केले नाही. हा महाराष्ट्र सरकारसाठी चिंतेचा विषय आहे', असेही पाटील म्हणाले.

Previous Post Next Post