अंध झालेल्या मुलांना जगण्याचा मार्ग दाखवला-विश्वनाथ मुडपे


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर

उदगीर : आज आपल्या समाजात अंध आपंग मुल अनेक आहेत.त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते.ते ग्रामीण भागातील अंध मुलांना सहसा लाभत नाही पण उदगीर येथे डाॅ.रामप्रसाद लखोटीया व त्यांच्या टीम मार्फत ही सेवा मोफत अंध मुलाना करत आहेत असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे सर यांनी हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त अरूणा अभय ओस्वाल रिसौरस सेंटर फाॅर ब्लाइंड येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालयचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे होते,तर अँड.राजकुमार नावंदर,प्रा.राजेंद्र चव्हाण,प्रा.मुक्कावार,जाधव सर, ला.विवेक जैन,योगेश चिद्रेवार,मंठाळकर आकाश,यांच्या सह मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करूण करण्यात आली.
पुढे अध्यक्षीय भाषणात शिक्षणतज्ज्ञ हेलन केलर यांचा जन्म 27 जुन 1880 रोजी झाला होता.त्यांनी अंधांना जगण्याचा व हक्कासाठी लढण्याचा स्वावलांबी बांण्याचस,जी पुढे अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचा स्रोत बनली त्यामुळे आपल्या अंधशाळेतील मुलांनी शिक्षण घेत आपले नाव कमवावे, स्वताच्या पायावर उभे रहावे अंधत्वावर मात करूण अंध असुनही अंधत्वहीन जिवन जगवुन दाखवावे या पृथ्वीवर कोणतीही गोष्ट अश्यक नाही असे ते उपस्थितांना विद्यार्थाना मार्गदर्शन केले.

यावेळी गणेश मुंडे, रेखा माने, भालेराव सर,माने सर,यांच्या सह अंध विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.राजेंद्र चव्हाण यांनी केले.
अंध झालेल्या मुलांना जगण्याचा मार्ग दाखवला-विश्वनाथ मुडपे अंध झालेल्या मुलांना जगण्याचा मार्ग दाखवला-विश्वनाथ मुडपे Reviewed by सह्याद्री चौफेर on July 02, 2022 Rating: 5
Powered by Blogger.