टॉप बातम्या

पंडित दीनदयाळ उपाध्याय येथे आरोग्य शिबिर संपन्न

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व.नागनाथ अण्णा निडवदे यांच्या 62 व्या जयंतीनिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक विद्यालय उदगीर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
        
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री प्रमोद राव कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री पाचपुंडे मामा उपस्थित होते तर तज्ञ डॉक्टर ची टीम डॉ. अनूप चिकमुर्गे,डॉ. विजय बिराजदार ,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.नाईकवाडे,डॉ.सचिन टाले,डॉ.प्रशांत नवटक्के,डॉ.महेश धुमाळे,डॉ.शीतल पाटील,डॉ.राम पाटील आदी जन उपस्थित होते.
या शिबिराचा 634 रुग्णांनी लाभ घेतला.शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री शिवानंद होंनमोडे,श्री रमेश शेरिकर मुख्याध्यापिका सौ. सुजाता ताई होंनमोडे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. अश्विनी ताई निडवदे आदी सह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post