उदगीरच्या प्रभाग 18 मधील व्यंकटेश नगर व कानमंदे नगरच्या अध्यक्षपदी विजय राठोड तर सचिव पदी सुधाकर मोहिते यांची बिनविरोध निवड

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : उदगीर शहर शैक्षणिक सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असून येथील प्रभाग 18 मधील व्यंकटेश नगर व कानमंदे नगरातील समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी व दोन्ही नगराचा विकास करण्यासाठी या नगरीच्या अध्यक्षपदी शिक्षक तथा संस्थाचालक विजय राठोड तर सचिव पदी सेवानिवृत्त शाखाधिकारी सुधाकर मोहिते यांची निवड करण्यात आली. 
उपाध्यक्षपदी व्हाईस चेअरमन अरविंद धनुरे व प्रा.अनंत पाटील यांची निवड करण्यात आली असून सहसचिव म्हणून शिक्षक राजेंद्र सास्तुरकर कोषाध्यक्ष पदी शिक्षक बालाजी सुवर्णकार यांची निवड करण्यात आली असून या सदस्यांमध्ये प्रशांत डोंगळीकर नारायण नागंपल्ले डॉ.आदिनाथ मरकड शिक्षक विजय जाधव उदय कुलकर्णी कमल पवार प्रा. नरसिंह भगवे अनिरुद्ध रनसूभे शुभम रायवाड इत्यादीचा समावेश आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र व अभिनंदन व कौतुक होत आहे.
उदगीरच्या प्रभाग 18 मधील व्यंकटेश नगर व कानमंदे नगरच्या अध्यक्षपदी विजय राठोड तर सचिव पदी सुधाकर मोहिते यांची बिनविरोध निवड उदगीरच्या प्रभाग 18 मधील व्यंकटेश नगर व कानमंदे नगरच्या अध्यक्षपदी विजय राठोड तर सचिव पदी सुधाकर मोहिते यांची बिनविरोध निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on July 02, 2022 Rating: 5
Powered by Blogger.