विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : पावसाळा सुरु होताच अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. काल (ता.2 जुलै) गडचांदूरहुन एक विद्यार्थी बिएड चा पेपर देऊन परत आपल्या स्वगृही येत असतांना एका दुचाकीस्वाराचे अनियंत्रण होऊन मोटरसायकल राज्य महामार्गावरील असलेल्या डिव्हाईडरला धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गौराळा फाट्याजवळ सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान, घडली.
पारस ठक (25) रा. मारेगाव प्रभाग क्रमांक 16 असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो बिएड चा पेपर देवू गावाकडे परत येत असतांना वणी यवतमाळ महामार्गवरील गौराळा फाट्यावर त्याची बाईक डिव्हाईडर वर आदळली
अशी चर्चा एकावयास मिळते, घटनास्थळी हा युवक बेशुद्ध अवस्थेत पडून दिसला असतांना, वणी कडून येत असणाऱ्या काही तरुणींना तो दिसला असता त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अपघातात झालेल्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने येथील प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याचे समजते.
मारेगावातील युवकाचा राज्य महामार्गांवर अपघात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 03, 2022
Rating:
