निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर
वणी : गेल्या तीन दिवसापासून ग्रामपंचायत मोहदा येथील पाणी पुरवठा बंद होता, पाण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याने गावातील उपसरपंच व सदस्यांनी स्वतः विहिरीवर चढले आणि पाणी पुरवठा मोटर दुरुस्त केली. त्यामुळे उप सरपंच सचिन रासेकर व सदस्य गणेश बोन्डे, गजानन शेलवडे तसेच महिला सरपंच असल्याने त्यांचे पती रवींद्र राजूरकर हे वेळोवेळी सहकार्य करित असतात, त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावाचे उपसरपंच व सदस्य हे खऱ्या अर्थाने जनसेवक असतो हे तालुक्यातील मौजा मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर व सदस्य गजानन शेलवडे, गणेश बोन्डे यांनी कृतीतून दाखवून दिले. या तिघांनी विहिरीवर चढून काम करणाऱ्या टीमसोबत जवळपास 5 ते 6 तास स्वतः काम करून पाणी पुरवठा मोटर बंद पडलेली दुरुस्त करून गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यांचे "प्रॅक्टिकल मॅन" म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य हे केवळ मिरवायचे पद नसून तो गावचा प्रमुख देखील असतो, पूर्वी उपसरपंच,सदस्य लोकांना सहज उपलब्ध व्हायचे आता तेच सरपंच शुभ्र कपड्यातील नेते झाले आहेत. तर काहींना लोकांना भेटण्याचे सौदार्य नसते, मात्र, मोहदा गावातील पाणी पुरवठा मोटार बंद पडल्याने तीन दिवसापासून ग्रामस्थांना पाणी मिळत नव्हते.
त्यामुळे येथील उपसरपंच सचिन रासेकर,सरपंचा यांचे पती रवींद्र राजुरकर व सदस्य गजानन शेलवडे, गणेश बोन्डे तसेच पाणी पुरवठा कर्मचारी विनोद नक्षीने, आमचे मित्र अमोल शेलवडे व नीळकंठ हेपट यांच्या चमू सोबत पाच ते सहा तास मोटर दुरुस्ती चे काम करून त्यांनी गावाला मिळणारा पाणी पुरवठा सुरळीत केला.
उपसरपंच सचिन रासेकर यांच्याशी संवाद साधला आता ते म्हणाले की, मला मिरवायला अजिबात आवडत नाही, मी शेतकरी कुटुंबातील माणूस.मला काम करायला आवडत म्हणून मी आणि माझी टीम 'प्रॅक्टिकल ' कामावर जास्त भर देतो आहे. त्यासाठी सर्वांची साथ असावी लागते त्याशिवाय कुठलंही काम होणं शक्य नाही म्हणून गावाच्या हितार्थ सर्वांनी एक असलं पाहिजेत असेही बोलताना म्हणाले.
मौजा मोहदा येथील उपसरपंच व सदस्य चढले विहीरीवर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 03, 2022
Rating:
