कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै 2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आज अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर आणि राजन प्रभाकर साळवी या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदस्य अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी ॲड नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनावर नेऊन स्थानापन्न केले.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत विधानपरिषदेत निवडून आले होते. तीन वर्ष ते राष्ट्रवादी चे विधान परिषदेचे सदस्य होते. मात्र 19 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला म सध्या ते भाजपचे आमदार आहेत. मुंबईतील कुलाबा मतदार संघांचे ते आमदार आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 03, 2022
Rating:
