टॉप बातम्या

कात्री येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


रूस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : तालुक्यातील कात्री येथील रहिवासी असलेल्या एका शेतमजूराने गळफास घेऊन आपली जिवण यात्रा संपविली. 
अंकुश निळकंठ रोहणे (४५) वर्ष याने काल (ता.२) मध्यरात्री राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.
मृतक अंकुश रोहणे हा शेतमजुरी करीत होता त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
मात्र आत्महत्येचे मुळ कारण समजले नाही.
या बाबत पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आल्याची माहिती मिळाली. मृतकाला ग्रामीण रूग्णाल्यात कळंब येथे  शवविच्छेदनाकरीता रवाना करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.
Previous Post Next Post