अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांचे माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांना नेत्र चेकप व चष्मे वितरण
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : आमचे प्रेरणास्थान आदरणीय आमदार
श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ नियोजन मंत्री यांचे जनसेवा हीच ईश्वर सेवा ही दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून श्री अनिल डोंगरे यांचे माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात महात्मा गांधी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम वर्धा यांचे माध्यमातून 42 व्यक्तींचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन आज त्या लाभार्थ्यांना औषध उपचार व श्री अनिल डोंगरे यांच्या वतीने चष्मे वितरण करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी कस्तुरबा हॉस्पिटल वर्धा चे डॉक्टर सचिन ताकसांडे डॉक्टर गौरव मावळे डॉक्टर वीरेंद्र कराडे डॉक्टर चौधरी सर हे उपस्थित होते.
अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांचे माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांना नेत्र चेकप व चष्मे वितरण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2022
Rating:
