रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर
कळंब : दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कळंब एस. एस. भगत यांचे मार्गदर्शनात या वर्षीही दिनांक 25 जून 2022 ते 1 जुलै 2022 पर्यंत कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेमध्ये सातही दिवस शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या अनुषंगाने कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे 27 जून 2022 रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवसाच्या निमित्ताने महिलांची सभा आयोजित करण्यात आली होती. प्रमूख मार्गदर्शक म्हणुन माहेंद्र ओंकार कृषि सहाय्यक डोंगरखर्डा उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रित उमेद अभियानचे तालुका अभियान व्यवस्थापक भास्कर कुमरे. प्रभाग समन्वयक जयश्री बांडबुजे, आदेश भगत, कृषि सहाय्यक एस एस आगलावे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महेन्द्र ओंकार यांनी नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पाअंतर्गत महिला गटाना काय लाभ घेता येईल ज्यामधे अन्न प्रक्रिया युनिट, अवजार बँक, दालमिल, गोडाऊन तसेच मसाला व तेल युनिट आदी घटकांचा कशाप्रकारे लाभ घेता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बिगर सातबारा धारक यांनी PMFE योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. कुमरे सर यांनी गटांचे प्रभाग संघात ( CLF) मध्ये रुपांतर करणे तथा शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) स्थापन करण्याबाबत मार्गर्शन केले.कृषि सहाय्यक एस. एस. आगलावे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनाबाबत मार्गदर्शन केले. जयश्री बांडबुजे मॅडम तथा आदेश भगत यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सविता वरफडे, कृषि ताई शुभांगी मासुळकर, कुसुम जांभुळे, चैताली जयस्वाल, सुषमा लोखंडे, आरती जांभूळकर, पुजा चावरे, सौ. येबरे , सौ. सुनिता बनसोड, सौ. माधुरी देशमुख आदी महिलांसह अनेक महिलांनी उपस्थीती होती.
डोंगरखर्डा येथे महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमिकरण दिवस साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2022
Rating:
