टॉप बातम्या

निराधारांना मिळाला जगण्याचा आधार

नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

वणी : गोरगरीब सर्वसामान्याचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे मोहदा येथील उपसरपंच श्री सचिन रासेकर यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील निराधारांचा आधार म्हणजेच "
जेष्ठ नागरिकांना मिळणारा "निराधार" हा मिळाला. सचिन रासेकर यांचे लोकांच्या "निड" कडे विशेष लक्ष देत असतात 
त्यांनी नुकतेच दिव्यांगाना सर्वसाधारण फंडातून आर्थिक मदतीचा लाभ वितरित केला आहे.
मोहदा रहिवाशी मागील काही दिवसापासून जेष्ठ नागरिक निराधाराच्या प्रतीक्षेत होते, त्यासाठी त्यांची संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवणे सुरु होते. 'आज मिळेल, उद्या मिळेल' या आशेने थकलेली पाय श्री रासेकर यांना भेटून आपली व्यथा मांडली, त्यानंतर सचिन रासेकर यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडी चे वणी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या मार्गदर्शखाली पुढाकार घेवून निराधारांना त्यांचा जगण्याचा आधार  मिळवून दिला. निराधार योजनेचा लाभ मिळाल्याने लाभार्थी सुखावला असून त्यांचे आभारही मानले. जवळपास दहा लाभार्थ्यांना निराधाराचा लाभ मिळाला यात विधवा, श्रावणबाळ या लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे खुद उपसरपंच सचिन रासेकर यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
"मला सर्वसामान्य लोकांची कामे करायला आवडतं, मी सुरुवातीपासूनच गावाच्या विकासाच्या दृष्टीने सतत सामाजिक कार्यासाठी नेहमी माझी व माझ्या सहकाऱ्यांची धडपड सुरु असते. त्यात काही राजकीय अडचणी येतात मात्र, गावाच्या हितार्थ कार्य करित असतांना त्यात राजकारण पुढं यायला नको हीच अपेक्षा."

- सचिन रासेकर
उपसरपंच मोहदा ग्रामपंचायत
मो. नं. 93098 90774
Previous Post Next Post