टॉप बातम्या

चंद्रपूर: शासनाने पुर परिस्थितीचा आढावा घेवून नुकसानग्रस्ताना मदत द्या - अनिल डोंगरे (प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र)

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : तालुक्यातील विचोडा (बू), विचोडा, रई, चांदसुर्ला, छोटा नागपूर आंबोरा (जुनी), पडोली, पायली, भटाळी, चिचोली, किटाळी, वढोली, लखमापूर, झोपडपट्टी इत्यादी गावातील इरई नदीच्या पुराने वेढले असून, कित्येक गाव पाण्याखाली आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 
शेतकऱ्याच्या शेतमालाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारों हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून, बळीराला आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पुर परिस्थिती चा आढावा घेवून शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांनी प्रसिद्धी पत्रकातून मागणी केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();