सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : फिस्की जंगल परिसरातील खराब व अरुंद रस्त्याच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे गट) कडून तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे वारंवार अपघात होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम टाकणे व दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.