टॉप बातम्या

कुटुंबाचा कर्ता तरुण हरपला, स्व. गणेश बबनराव परचाके अनंतात विलीन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मच्छिन्द्रा येथील मनमिळाऊ स्वभावाचे व समाज कार्याची ओढ असलेले तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका सचिव अमोल कुमरे यांच्या अत्यन्त निकटवर्तीय असलेले कार्यकर्ते गणेश बबनराव परचाके यांचे शनिवारी सकाळी सुमारे 7.30 वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

आज शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांना घरीच अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना वणी येथे उपचारासाठी नेले होते.त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहीणी, भासा-भासी, असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. दि. 21 मार्च 2026 रोजी दुपारी 3.15 वाजता नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश परचाके हे अलीकडेच भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे भाजपा तसेच मच्छिन्द्रा ग्रामस्थांमध्ये मोठी शोकभावना व्यक्त केली जात आहे.

"सह्याद्री चौफेर" परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();