नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर
महागाव : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रविण जयस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मागील चार पाच दिवसांपासुन पावसाने थैमान घातल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे अगोदरच दुबार पेरणीचे संकट ओढवले असतांना आता पुन्हा अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असुन पावसामुळे व नदी,नाल्यांच्या पुरामुळे पिके पुर्णतः खराब झाल्याने शेतकऱ्यांसमोर जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे पूरपरिस्थिती व नुकसानीची पाहणी करण्यासाठी महागाव तालुक्यातील धनोडा येथे आले असतांना त्यांच्याकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी केली.