नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर
महागांव : तालुक्यात सध्या पावसाचे थैमान असतांना पैनगंगा नदी धोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वरोडी (जुनी), कासारबेहळ, या गावात नदीचे पाणी शिरण्याची शक्यता आहे असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.
मागील दहा दिवसापासून संततधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. तसेच सतत च्या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. आज पावसाने उसंत घेतल्यानंतर परत पावसाची सरी येत आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे.
तालुक्यातील राहूर, कासारबेहळ, सेवानगर, कवटा, थार, धनोडा ही गावे नदी ला लागून असल्यामुळे जर पावसाने उसंत घेतली नाही तर नदीचे पाणी गावात शिरायला वेळ लागणार नाही असे या परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सांगितले आहे. पैनगंगा कासारबेहळच्या पन्नास मिटरच्या अंतरावर वाहत असून कापूस सोयाबीन व ऊस पिके पाण्याखाली गेली असून ते खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परिणामी प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी संभाजी पावडे भाजपा ता उपाध्यक्ष यांनी केली आहे.
दहा दिवसापासून महागाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन प्रभावित झाले आहे. शेकडो हेक्टर पाण्याखाली आली असतांना आतापर्यंत एकही संबंधित विभागाचे कर्मचारी त्या परिसरात फिरकले नाही ही शोकांतिका आहे मानवी लागेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.