सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार असून शहरातील विविध मार्गांवरून उत्साहात मार्गक्रमण करणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.