सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत मारेगाव तालुका व शहर कार्यशाळा मंगळवार, दिनांक 24 मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
बदकी भवन येथे 23 व 24 मार्च दरम्यान आयोजित या दोन दिवसीय कार्यशाळेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेचे उदघाटन यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री.प्रफुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, महिला प्रदेश सरचिटणीस मायाताई शेरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, गजानन भोकरे, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दीपक पोहनकर, मंगेश देशपांडे, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट तसेच नेते शंकर लालसरे माधव कोहळे, माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटी, विचारधारा आणि प्रभावी कार्यपद्धती याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या अभियानाचा समारोप माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आपल्या समारोपपर भाषणात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्य, भूमिका व जनहितासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांचे सविस्तर विवेचन केले. तसेच या प्रशिक्षण महाअभियानातून सात सत्रातून महत्त्वपूर्ण उपक्रम मांडण्यात आले असून, ते तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिस्तबद्ध नियोजन, सक्रिय सहभाग आणि सकारात्मक वातावरणामुळे कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, सरचिटणीस प्रसाद ढवस, किसानचे पवन ढवस, ता. सचिव अमोल कुमरे, कार्याध्यक्ष वैभव पवार, नगरसेवक राहुल राठोड, सुनीता जुमनाके, मालाताई गौरकार, शालिनीताई दारुण्डे, महिला आघाडी च्या दीपिका रस्से, शोभा ताई नक्षणे, नंदा ताई थेरे, सुनीता पांढरे, संगीता बोढाले, हर्षा महाकुलकर,
चंद्रशेखर काळे, विजय खिरटकर,अभिजित मांडेकर, मारोती तुराणकर, सुनील देऊळकर, प्रशांत जुमडे, मारोती राजूरकर, अल्पसंख्याक अध्यक्ष इफ्तेखार शेख, रामचंद्र जवादे, प्रवीण नान्हे, विशाल गाडगे, अतुल खिरटकर, प्रसाद झाडे, अनिकेत चोपने, डोमाजी भादिकार, दुष्यन्त निकम, गणेश गाणफाडे, वसंता घोटेकर दिलीप आत्राम, गणेश खडसे, केशव मेश्राम, उमेश मिलमिले, प्रवीण काकडे, प्रवीण बोथले, भास्कर कपाळकर, शंकर रस्से, आशिष खंडाळकर, अजिक्य काटवले, विजय क्षीरसागर, गणेश खुसपुरे, यांनी अथक परिश्रम घेतले.