टॉप बातम्या

उल्लेखनीय कार्याची दखल; संजय खाडे यांच्याकडे पूर्व नागपूरची सूत्रे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणीवणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस नेते व प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. अचलपूर मतदारसंघातील उल्लेखनीय कामगिरीनंतर त्यांची पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वीच त्यांच्या खांद्यावर प्रदेश सचिवपदाची जबाबदारी असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार त्यांना ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

संजय खाडे हे परिसरात शेतकरी व कामगार नेते म्हणून ओळखले जातात. विविध आंदोलन, मोर्चे व जनआंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. अचलपूर मतदारसंघात त्यांनी ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करत जनसंपर्क वाढवण्याचे काम प्रभावीपणे केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पूर्व नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.

पूर्व नागपूर हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा शहरी मतदारसंघ मानला जातो. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात विविध समाजघटक, कामगार वर्ग, व्यापारी आणि युवकांचा मोठा सहभाग आहे. नागरी प्रश्न, स्थानिक विकासकामे आणि पक्षनिष्ठा या घटकांवर येथे निवडणुकीचे चित्र ठरते. त्यामुळे पूर्व नागपूर हा शहराच्या राजकारणात निर्णायक मानला जातो.

पूर्ण ताकदीने काम करणार – संजय खाडे

“पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अचलपूरमध्ये केलेल्या कामाच्या बळावर आता पूर्व नागपूरमध्येही पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिक, युवक, कामगार व महिलांशी थेट संवाद साधून तसेच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांशी समन्वय साधून पक्ष संघटन मजबूत करणे हेच माझे ध्येय राहील,” अशी प्रतिक्रिया संजय खाडे यांनी दिली.

संजय खाडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पूर्व नागपूरमध्ये पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();