कोविड सानुग्रह अनुदानातील 'ती' क्लिष्ट अट शिथिल करा - निमेश मानकर

राज्यमंत्री मा. प्राजक्तदादा तनपुरे यांनी सकारत्मक निर्णय घेऊ असे दिले आश्वासन

 
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : कोविडमुळे जगात, आपल्या देशात हाहाकार माजला असताना आपले महाराष्ट्र राज्य सुद्धा याला अपवाद नव्हते. देशभरात ४० लक्ष लोकापेक्षा जास्त कोरोना मुळे बळी पडले. ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने बर्‍याच रुग्णांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन उपचार घेतला. काही रुग्ण बरे झाले, काही दगावले. यासदर्भात महाराष्ट्र शासनाने सानुग्रह अनुदान 50 हजार रुपये कोरोना मुळे मृत व्यक्ती पावलेल्या कुटुंबाच्या वारसदारांना मिळणार असा GR काढला होता. त्याच अनुषंगाने कुटुंबाच्या वारसदारांनी चंद्रपूर जिल्ह्यातून सानुग्रह अनुदान मिळावा याकरिता ऑनलाईन अर्ज केलेला होता. परंतु जवळपास एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असताना सुद्धा मृत व्यक्तीच्या  कुटुंबांच्या वारसदारांना आर्थिक मदत मिळाली नाही. चंद्रपूर जिल्हातील संबधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता माहिती दिली की,ज्या राज्यात covid पेशंटचा मृत्यू झालेले आहे, त्या राज्यातूनच/जिल्ह्यातून ऑनलाइन अर्ज करावा आणि त्याच राज्यातून योजनेचा लाभ घ्यावा. मृत्यू पावलेले व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे रहिवासी होते, ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध नसल्याने  उपचाराकरिता पर राज्यात गेले होते. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि यातील क्लिष्ट अट शिथिल करून मृत व्यक्तीच्या वारसदारांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी राज्यमंत्री मा. ना.प्राजक्त तनपुरे साहेब यांना मुंबई इथे मंत्रालयात भेट घेऊन केली.
साहेबांनी यावर सकारत्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
कोविड सानुग्रह अनुदानातील 'ती' क्लिष्ट अट शिथिल करा - निमेश मानकर कोविड सानुग्रह अनुदानातील 'ती' क्लिष्ट अट शिथिल करा -  निमेश मानकर Reviewed by सह्याद्री चौफेर on June 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.