विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मार्डी- नांदेपेरा ते वणी महामार्गवरून दीड किलोमीटर आत असलेल्या बामर्डा येथील पुल जीर्ण झाल्याने पुलावरून जाण्यासाठी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत, रुग्णांना दवाखान्यात व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे, याबाबत मागील कित्येक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी गावाकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर हे करित होते. लोकप्रतिनिधी स्थानिक प्रशासन यांना मौखिक,लेखी मागणी करून सुद्धा कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याने अखेर या मागणी संदर्भात ६ महिन्यापूर्वी आसुटकर पाथ फाउंडेशनच्या मदतीने राज्य मानवधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामध्ये नवीन पुल बांधण्यात यावे ही मुख्य मागणी होती. आता या पुलाची बाजू लक्षात घेता राज्य मानवधिकार आयोगाने घटनेची चौकशी करून सदर पुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी आदेश दिले असून एका महिन्यात बांधकाम पूर्ण करण्यात यावे तसा अहवाल सादर करण्याचे पत्र जारी केल्याचे आसुटकर यांनी सांगितले आहे. त्यांच्या मागणीला यश आले असून बामर्डा पुलाचे सध्या तात्पुरते डागडुग्गी सुरु असल्याचे आसुटकर यांनी सांगितले. तूर्तास सदरील पुलाचे पूर्ण बांधकाम झाल्यावरच समाधान व्यक्त करण्यात येईल असेही ते 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना म्हणाले.
अखेर बामर्डा येथील पुलाचे बांधकामाला सुरुवात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 13, 2022
Rating:
