झरी जामणी : ग्रामसेवक प्रशासककडे तक्रारी करून तक्रारीवर केल जात आहे दुर्लक्ष


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : माथार्जुन ग्रामपंचायत मधील हद्दीतील व सामाजिक जागेवर शासकीय बांधकामाच्या अनेक तक्रारी झाल्या असून माजी उपसरपंच संतोष जंगीलवार याचा कार्यकाळातील जागेचे व ब्लॉक चे तक्रारी त्यातलीच पुन्हा एक तक्रार २१ मार्च रोजी ग्रामपंचायत हद्दीतील गाळ्या विषय ग्रामसेवक यांना तक्रार देण्यात आली होती. तक्रारीवर पाठपुरावा करात ग्रामसेवक यांनी दि.२४ मार्च रोजी प्रति उत्तर देत संबंधित ब्लॉकचे नमुना क्रमांक ८ मध्ये पडताळणी मध्ये नोंद आढळून आले नाही व ब्लॉक परस्पर करारनामा करून भाडेकरार करण्यात आले आहे. ग्रामसेवक यांचे लेखी पत्र मिळताच दि.२८ मार्च रोजी पुन्हा तक्रार करण्यात आली. त्यामध्ये चौकशी होई पर्यंत प्रशासकीय शील बंधी करण्यात यावी. नंतर ग्रामसेवक यांना वारंवार मौखिक जाब तक्रार करते यांनी विचारले असता ग्रामसेवक यांनी दि.३१ मे रोजी कृषी केंद्र चालक नितीन गोरे यांना ७१ दिवसाने ग्रामपंचायत नोटीस पाठवण्यात आली. नितीन गोरे यांना नोटीस मिळताच त्यांनी नोटिसाचे प्रति उत्तर देत नाहरकत प्रमाणपत्र,ठराव देऊन अपुरे पुरावे ग्रामपंचायत सादर केल्याचा आरोप करत कर पावती,फ्रॉशिटिंग पुस्तिका,नमुना ८ व कृषी केंद्रा बांधकाम चालवण्यासाठी चालकाचे साधा विनंती अर्ज केला नाही नसल्याचे म्हणत गट विकास अधिकारी झरी मार्फत ग्रामविकास मंत्री मा.हसन मुश्रीफ केंद्रीय गृहमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र यांना करण्यात आली असून संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकारी यांच्या कडून कोणती चौकशी करण्यात येईल याच्या कडू सर्वांचे लक्ष वेधले आहे.
झरी जामणी : ग्रामसेवक प्रशासककडे तक्रारी करून तक्रारीवर केल जात आहे दुर्लक्ष झरी जामणी : ग्रामसेवक प्रशासककडे तक्रारी करून  तक्रारीवर केल जात आहे दुर्लक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.