बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
लातूर : नुकत्याच संपन्न झालेल्या स्टार प्रवाह या चित्र वाहिनीच्या वतीने संपन्न झालेल्या गीत गायन स्पर्धेत लातूरची सायली सुनील टाकणे छोटे उस्ताद सुपरस्टार या स्पर्धेत महाराष्ट्रातून बाल कलाकारांमध्ये सुंदर गीत गायन सादर करून बाल कलाकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर,संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर,सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर,दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे,टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यालय,श्री विश्वकर्मा विकास महामंडळ च्या वतीने तिला महाराष्ट्राची बालकलाकार सुवर्णकन्या ने सन्मानित करण्यात आले यावेळी तिची आई सुषमा टाक व वडील सुनील टाक व भाऊ व्यंकटेश टाक ची एम बी बी एस साठी निवड झाल्याबद्दल वरील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात व सत्कार समारंभ प्रसंगी टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य खासगी विद्यालयाचे मुख्य ॲडमिन तथा श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षक बालाजी सुवर्णकार, विश्वकर्मा विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे सुदर्शन बोराडे,ओबीसी ब्रिगेडचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीप पिनाटे,विश्वकर्मा विकास महामंडळ लातूर चे जिल्हाध्यक्ष सुदाम पांचाळ,टीचर ग्रुपचे सदस्य तथा संग्राम माध्यमिक विद्यालय उदगीर येथील सह शिक्षक पंडित पांचाळ, पाटोदा तालुका जळकोट येथील सेवा निवृत्त माजी सैनिक विलास नागरगोजे,राज्य उत्पादन शुल्क कार्यालय लातूर येथील टंक लेखक तथा लिपिक नितीन रत्नपारखी,चाकुर येथील सुवर्णकार समाजाचे सदस्य सागर रत्नपारखी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सन्मान सोहळ्यानंतर सर्वांनी सायली व तिच्या आईवडिलांचे भरभरून कौतुक करून पुढील कार्यासाठी सर्वांनी सायली टाकला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सुपर स्टार छोटे उस्ताद सायली टाकचा लातूरात झाला सन्मान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 13, 2022
Rating:
