सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : नगरपरिषदसाठी निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. वणी नगरपालिका आगामी निवडणुकीत महिलाराज दिसणार असून होऊ घातलेल्या नगरपरिषद 2022 निवडणुकीचे पडघम वाजू लागले.
13 जून रोजी महसूल भवन सभागृहात प्रभाग निहाय आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये शहरातील अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती 2 व सर्वसाधारण असे एकूण 14 प्रभागातून 29 सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये महिलांकरिता शहरात अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, आणि सर्वसाधारण या प्रमाणे एकूण 15 महिलांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. उर्वरित 14 उमेदवारामध्ये सर्वसाधारण पुरुष स्त्री असे जनरल आरक्षित आहेत.
या निवडणुकीत महिलांचे प्रमाण 50 टक्केच्या वर असून, आगामी निवडणुकीत महिलांराज गाजवणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहे. तर नगरसेवकांच्या प्रभागातील राखीव जागा व फेरबदल झाल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे.
दुपारी 12 वाजता या आरक्षण सोडत कार्यक्रमादरम्यान शहरातील अनेक पक्षाचे राजकीय पुढारी, कार्यकर्ते, पत्रकार व सामान्य नागरिक मोठया संख्येने हजर होते.
उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे व मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचे उपस्थितीत एका लहान मुलाच्या हाताने आरक्षण सोडत काढण्यात आली,यावेळेस आरक्षण सोडतीचे कामकाज महसूल व नगरपरिषदचे कर्मचारी यांनी पाहिले.
आरक्षण व सोडतीचे हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी 15 जून ते 21 जून असणार आहेत.
वणी नगरपालिका निवडणुक 2022 आरक्षण सोडत जाहीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 13, 2022
Rating:
