जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान; दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्येती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या डॉ. प्रकाश आमटेना न्यूमोनियाची लागण झाली आहे. यांना ब्लड कॅन्सरचे
 निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आमटे यांना दुर्मिळ अशा हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यावर सध्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गेल्या १० दिवसांपासून त्यांना न्यूमोनिया झाला आहे. यामुळे त्यांना खूप ताप असून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे वर उपचार सुरु आहेत. न्यूमोनियाचा असर कमी झाला अन् शारिरीक ताकद वाढली की, त्यांच्या कॅन्सरचे उपचार सुरु करणार असल्याची माहिती कळते. त्यांच्या विविध तपासण्याही सुरु आहेत.

 डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

दरम्यान, कुणीही फोन करुन डिस्टर्ब न करण्याची विनंती आमटे कुटुंबीयांनी केली आहे. 
जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान; दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान; दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.