लाचखोर सहायक अभियंता ६ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात


कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : डिमांड काढून देण्याच्या कामासाठी विद्युत वितरण कंपनी वरोरा, मधील सहायक अभियंता याला ६ हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. 

तक्रारदार हे वरोरा येथील रहिवासी असून सोलर सिस्टम फिटिंग व इलेक्ट्रिशियन चे कामे करतो, सोबतच ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टम लावण्याचे काम करीत असून त्यासाठी डिमांड काढण्याच्या कामासाठी सहायक अभियंता श्रीणु बाबू चुक्का यांनी तक्रार कर्त्याला सहा हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार केली. 
लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी प्रकरणाची पडताळणी करीत प्लॅन आखला व महावितरण कार्यालय वरोरा येथे आज २७ जून रोजी तक्रारदाराकडून सहायक अभियंता श्रीणु चुक्का हे सहा हजार रुपये घेत असतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली.
सदरची कार्यवाही ही राकेश ओला पोलीस उपायुक्त,पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोनि शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, राकेश जांभुळकर, वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
पुढील तपास सुरू आहे.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी,कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
लाचखोर सहायक अभियंता ६ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात लाचखोर सहायक अभियंता ६ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात  Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.