'युनिक मेडिकल फौंडेशन'च्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार

अतुल खोपटकर | सह्याद्री चौफेर 

पुणे : पंढरीच्या वारीत समाजसेवा करायच्या उदात्त आणि निस्वार्थी हेतूने 'युनिक मेडिकल फौंडेशन' जनवाडी-पुणे 16, गेली १५ वर्षे आपलं योगदान देत आली आहे.

पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांना पुणे येथे गुरूवार दि २३ जून ला जनवाडी येथील विर बाजीप्रभू प्रशाला, दत्तवाडी येथील त्रिमूर्ती निवास व सासवड येथे शनिवार २५ जून ला संत सोपान काका समाधीमार्ग व जगताप बंधू यांच्या येथे पंढरीच्या वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार करण्यात आला.
या वर्षी १६०० वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला यात ८०० वारकऱ्यांना इंजेक्शन देण्यात आले तसेच पेन किलर मलमांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर लोखंडे, डॉ. राहुल लोखंडे, मानसी लोखंडे, श्री नारायण फणसे, डॉ. सुप्रिया लोखंडे आणि सर्व डॉक्टर टीम, दिलीप शिवाजीराव ढेरे, जाधवराव, वैशाली खंडागळे, पद्मा रमपुरे, संण्डे क्लबचे सुनील भांडवलकर टीम, सुभेदार मोहन शेलार, जयवंत कुंभार (आयुष मेडिकल), योगिता गिरीगोसावी (कुणाल मेडिकल) यांनी सहकार्य केले.
'युनिक मेडिकल फौंडेशन'च्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार 'युनिक मेडिकल फौंडेशन'च्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.